Nilanga Crime News , Doctor, Police  SaamTv
महाराष्ट्र

Crime News : निलंग्यात डॉक्टरला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी डॉक्टर मिथुन जाधव यांनी पाेलीसांत तक्रार दाखल केली आहे.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : माझ्या भावावर लवकर उपचार का केला नाही असे म्हणत निलंगा (nilanga) शहरातील एका डॉक्टरला (doctor) मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पाेलीसांनी दिली. (Tajya Batmya)

एका अपघातात किरकोळ जखमी झालेला एक व्यक्ती उपचारासाठी पांचाळ कॉलनी येथील श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्या ठिकाणी सेवेत असलेले डॉक्टर मिथुन सुदाम जाधव यांनी त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार सुरू केले. (Latur Latest Marathi News)

त्यानंतर काही वेळात रवी मेंगडे व त्याचा एक मित्र दवाखान्यात पाेहचले. त्यांनी तू माझ्या भावास वेळेवर उपचार का सुरू केले नाही असे म्हणत शिवीगाळ करत डॉक्टर मिथुन जाधव यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनीही जाधव यांना मारहाण केली.

तेथील टेबलावर असलेला लोखंडी पाना फेकून मारला व तो डॉक्टर जाधव यांच्या कानामागे लागला. तुला बघून घेतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी घटनास्थळी धावून आलेल्या डॉक्टर शेषराव शिंदे डॉक्टर नाईकवाडे यांंनी जाधव यांनी सोडविले. या प्रकरणी डॉक्टर मिथुन जाधव यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसात रवी मेंगडे आणि त्याच्या साथीदारवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

SCROLL FOR NEXT