NIA Amaravati Raid Saam TV
महाराष्ट्र

Amaravati NIA Raid: अमरावतीत NIAची छापेमारी, तरूणाला अटक, पाकिस्तान कनेक्शनचा संशय

NIA Raid in Amravati: अमरावतीत एक तरूण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएच्या छापेमारीत उघड झाली. तसंच तो फोनद्वारे पाकिस्थानच्या संघटनेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं.

Bhagyashree Kamble

देशात अनेक ठिकाणी सध्या एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. जम्मू काश्मीर, आसाम, महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,गुजरातमध्ये छापेमारी सुरू असून, महाराष्ट्राच्या अमरावतीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएनं अमरावतीच्या छायानगरात छापेमारी केली. तेव्हा तेथील एक तरूण पाकिस्तानमधील एक संघटनेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं.

एनआयएकडून अमरावतीच्या छायानगरात छापेमारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीत एक तरूण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएच्या छापेमारीत उघड झाली. तसंच तो फोनद्वारे पाकिस्थानच्या संघटनेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं. त्यामुळे अमरावतीतल्या नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

एनआयएच्या माहितीनुसार, एनआयएच्या टीमला एक ३५ वर्षीय तरूण पाकिस्तानच्या एका संघटनाच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं. त्याला रात्री उशीरा छाया नगरातून ताब्यात घेतलं असून, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हा तरूण पाकिस्तानच्या संघटनेसोबत संपर्कात होता. पाकिस्तानमधून फोन कॉल सुरू होते. असं चौकशीत निष्पन्न झालं.

अमरावतीच्या छाया नगरात रात्री उशीरा त्याला ताब्यात घेतलं असून, आणखीन कुणी व्यक्ती अथवा तरूण या संघटेनेशी संपर्कात आहे का? संपर्क नेमका कसा आणि कशासाठी सुरू होता? यासह इतर गोष्टींचा तपास सुरू आहे. अमरावतीच्या तरूणांचा पाकिस्तानमधील जेश ए मोहम्मद या संस्थेशी संबंध आहे का? याचाही कसून तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर अमरावती आणि छाया नगर परिसर अलर्ट मोडवर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT