Ngapur Crime News sana khan missing case main accused pappu sahu arrested  Saam TV
महाराष्ट्र

Sana Khan Case: भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Sana Khan Murder Case: नागपूर येथील भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात तपास करताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी सना खानचा बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News: नागपूर येथील भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात तपास करताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी सना खानचा बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आपणच सना खानची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

सना खानची हत्या केल्यावर तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याचं आरोपी अमित साहूने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, अमितने जेथून सनाचा मृतदेह नदीत फेकला तिथे पोलीस त्याला घेऊन गेले. पोलिसांकडून नदीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती आहे.

नागपूर येथील भाजपची पदाधिकारी सना खान १ ऑगस्टला जबलपूरला रवाना झाली होती. २ ऑगस्टला तिथे पोहोचल्यानंतर तिने आईला जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. पुन्हा फोन केल्यावर तिचा फोन बंद होता. सनाच्या आईने तिचा बिझनेस पार्टनर अमित साहूला फोन केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

मुलीसोबत काही तरी घडल्याचा संशय येताच सना खानच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल सनाच्या तपासासाठी एक पथक जबलपूरला रवाना केलं होते. पोलिसांनी त्याठिकाणी सनाच्या बिझनेस पार्टनर अमित साहूचा शोध घेतला.

मात्र, पोलीस येण्याआधीच तो फरार झाला होता. यावेळी पोलिसांनी आरोपी पप्पू साहूच्या ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरला अटक केली. यातील एका वेटरने पोलिसांना सना खानच्या हत्येची कबूली दिली होती. आपण अमित साहू याच्या गाडीतील रक्त साफ केल्याचं वेटरने पोलिसांना सांगितलं होतं.

दरम्यान, नागपूर गुन्हे शाखेचं पथक आरोपी अमित उर्फ पप्पू साहूच्या शोधात होतं. शुक्रवारी रात्रभर शोध घेतल्यानंतर पोलिसांनी अमित साहूला अटक केली. महत्त्वाचं म्हणजे चौकशीदरम्यान त्याने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आज आरोपीला नागपूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT