navi mumbai crime news  saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीने उचलले टोकाचं पाऊल

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) कोपरखैरणेमधून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित तरुणीचा सासरच्यांकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येण्यात येत होता. तसचे काही दिवसांपूर्वी विवाहितेच्या आईला घरी बोलावून अपमानित केल्याचा धक्का तिला सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. हर्षदा तरंगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

हर्षदा यांनी २०२० मध्ये हेमंत तरंगे यांच्यासोबत लग्न केले. हर्षदा ही लग्नापासून कोपरखैरणे सेक्टर १८ येथील सासरी राहायला होती. सासरच्यांकडून विवाहितेचा वारंवार छळ करण्यात येत असल्याने या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्यांविरोधात विवाहितेची आई वैशाली वाघमोडे यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पती हेमंत तरंगे, सासू मिताली तरंगे, सासरे अण्णासो, नणंद दीपाली मदने आणि धीर धवल तरंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती हेमंत याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

SCROLL FOR NEXT