Government Saam
महाराष्ट्र

Water Engineers: 'प्लंबर' नाही, आता 'वॉटर इंजिनिअर' म्हणायचं, राज्य सरकारच्या मंत्र्याचा निर्णय

Plumbers to be Called 'Water Engineers': राज्यातील ‘प्लंबर’ या व्यवसायिकांचा दर्जा बदलून त्यांना ‘वॉटर इंजिनिअर’ म्हणून संबोधले जाणार आहे.

Bhagyashree Kamble

एका कालावधीनंतर बऱ्याच ठिकाणची नावे बदलेली आपण पाहिलं असेल. देशातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत, याबद्दल आपण वारंवार ऐकत आलो आहोत. मात्र आता महाराष्ट्र सरकारकडून एक नवा निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. राज्यातील ‘प्लंबर’ या व्यवसायिकांचा दर्जा बदलून त्यांना ‘वॉटर इंजिनिअर’ म्हणून संबोधले जाणार आहे. याची माहिती नुकतीच राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. दौऱ्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.

मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल करून त्यांना नवीन नाव देणार असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.

नाशिक दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद

शुक्रवारी मंगलप्रभात लोढा नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच पदाधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या. यासह बुथ समिती, बूथ रचना या सगळ्याचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यानंतर त्यांनी शहराध्यक्षांची भेट घेऊन काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT