Rajkot Fort Saam Tv News
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम सुरू, राजकोट किल्ल्यावर कामाला वेग

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot: मालवणच्या किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी ६० फूट लांबीचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

Bhagyashree Kamble

मालवणच्या किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी ६० फूट लांबीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना पुतळा उभारणीचं काम देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी २० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या आधी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या ८ महिन्यात पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यासह केंद्र सरकारवरही टीका करण्यात आली होती. त्यामुळे सरकारनं लवकरच पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार या पुतळ्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

६० फूट उंच पुतळा उभारणीचं काम राजकोट किल्ल्यावर काम सुरू आहे. सध्या पुतळ्याचा चौथरा बनवण्याचं काम सुरू आहे. पुतळ्यासाठी खास ३ मीटर उंचीचा चौथरा उभारण्यात येईल. १०० टिकेल असा पुतळा उभारण्याची तयारी सुरू आहे. पुतळ्याचं बांधकाम अधिक मजबूत असेल असे सांगण्यात येत आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची कंपनी उभारणार आहे. यापूर्वी राम सुतार यांच्या कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम लवकर पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT