नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपासातून नवनवी माहिती समोर येतेय...अशातच या घोटाळ्याची पाळंमुळं थेट महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात रुजल्याचे समोर आलयं...नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूरनंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत पोहचलेत..
सीबीआयच्या पथकाने नांदेडमधील विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाच्या फ्लॅटवर 16 मे रोजी छापा टाकला. 8 तास कदम कुटुंबियांची कसून चौकशी करुन झाडाझडती घेतली. त्यावेळी कदम कुटुंबानं मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. कारण सराव परीक्षेत फक्त 100- 120 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला मुख्य परीक्षेत थेट 560 गुण मिळाल्याने संशय वाढलाय. विद्यार्थिनी आणि तिची आई 15 दिवसांसाठी पुण्यात तयारीला गेल्या होत्या अशीही धक्कादायक माहिती समोर आलीय...
दुसरीकडे, या घोटाळ्याचा मुख्य कट पुण्यात रचला गेल्याची माहिती सीबीआयच्या हाती लागलीय...मॉडर्न कॉलेजमध्ये गेली 24 वर्षे जीवशास्त्र शिकवणारी प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि लातूरमधील रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी मिळून जानेवारी महिन्यातच हा कट रचला होता. त्यात ब्युटीशियन मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे पुण्यात एकाच इमारतीत राहतात. मनिषा मांढरेनेच वाघमारेची प्रा. कुलकर्णींशी ओळख करून दिली. त्यामुळे 'सिक्रेट क्लासेस'च्या माध्यमातून मांढरे आणि कुलकर्णी विद्यार्थ्यांना नीट पेपर कसा पुरवायचे पाहूयात...
CBI तपासात काय? (सूत्रांची माहिती)
मनिषा मांढरे, पी. व्ही. कुलकर्णीनी मिळून पेपरसाठी 70 ते 75 विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात अडीज ते 3 लाखात डील झाली होती. जानेवारी महिन्यातच मांढरे आणि कुलकर्णींनं हा घोटाळ्याचा कट रचल्याचाही संशय आहे...त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुण्यात एका निवासस्थानी कुलकर्णी आणि मांढरे यांनी विशेष शिकवणी वर्ग घेतले होते... ज्यात मांढरेंनी एनटीएकडून मिळालेल्या गोपनीय अधिकारांचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना थेट नीट परीक्षेत येणारे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे प्रश्न वहीत लिहून दिले...
दरम्यान नाशिकमधील संशियत आरोपी शुभम खैरनार यांच्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉपसह महत्त्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आलेत...ज्यामुळे शुभमच्या संपर्कातील पालक, विद्यार्थी आणि संशयित एजंटचे धाबे दणादलेत...आतापर्यंत या प्रकरणात 9 जणांना अटक झाली आहे. त्यात...महाराष्ट्रातील लातूरमधून पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यात मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आलीय... तर राजस्थानमधून विकास बिवाल, दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल आणि हरियाणातून यश यादव यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलयं...
दरम्यान पैशांच्या मोहापायी काही जणांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासत गोरखधंदा सुरु केला. सीबीआयच्या तपासात आणखी किती मोठे मासे गळाला लागतायेत ते पाहणं महत्वाचं आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि नीट परिक्षा रद्द झाल्यानं आत्महत्या केलेल्या4 विद्यार्थ्यांच्या या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.