Neet Exam Scam x
महाराष्ट्र

Neet Exam पास व्हा फक्त ९० लाखात, नीट परिक्षा पास करून मिळेल; मार्क वाढवणारी टोळी महाराष्ट्रात

Neet Exam Scam : मुलाला डाँक्टर करायचंय...फक्त ९० लाखात नीट परिक्षा पास करून देतो, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर ? हो असं सांगणा-या भामट्यांना सीबीआयनं राज्यातून अटक केलीय. यातून अनेक बोगस विद्यार्थ्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे ... पाहा हा खास रिपोर्ट

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे. यांपैकी एका आरोपीचे नाव संदीप शहा असून, तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव सलीम पटेल असून, तो नवी मुंबईचा आहे. सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे.

या दोन आरोपींच्या वतीने गुण वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत पालकांना गंडा घातला जात असल्याचे समजल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने संदीप शहा याच्याशी संपर्क साधत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली.सीबीआयच्या अधिकाऱ्याने, तो पालक असून त्याच्या मुलाचे गुण वाढवायचे असल्याचे शहा याला सांगितले. शहा याने हे काम करण्यासाठी ९० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ८७ लाख ५० हजार रुपये इतकी निश्चित झाली. नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी सहा तास अगोदर मी गुण वाढवून देईन, असे आश्वासनही त्याने दिले.

या दोघांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. नीट प्रवेश पत्रिकांचे अनेक फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये आढळून आले असून अनेक बोगस नीट पास झालेल्या विद्यार्थी पालकांचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT