बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे पालन करण्याची गरज : गृहमंत्री SaamTv News
महाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे पालन करण्याची गरज : गृहमंत्री

परवानगी मिळाल्यानंतर बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोर पालन बैलगाडा मालकांसह आयोजकांनी करावे असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केले.

रोहिदास गाडगे

आंबेगाव : बैलगाडा शर्यत बंदी उठवल्यानंतर ग्रामीण भागात शर्यतींचे स्वरुप बदलत आहे. गावगाड्यांच्या जत्रा यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यतीचा (Bullock Cart Race) उत्सव मोठ्या जल्लोषात सुरु आहे. पुर्वीच्या काळात बैलगाडा शर्यतीच्या घाटात धोतर पायजामा टोपी घातलेल्या गावकऱ्यांची गर्दी पहायला मिळत होती. मात्र, आता बदलत्या काळाप्रमाणे जीन्स पॅन्ट घालणारी, बिगर टोपीवाली तरुणाई घाटात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बैलगाडा शर्यतीत तरुणाईचा मोठा सहभाग पहायला मिळत असल्याचे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी व्यक्त केले.

हे देखील पहा :

बैलगाडा शर्यतीत तरुणपिढीचा सहभाग वाढतोय. वेळ आणि काळ बदलत असला तरी बैलगाडा शर्यतीचा अंतिम निर्णय अजूनही न्यायालयात (Court) प्रलंबितअसून बैलगाडा शर्यतीचे नियम आणि कायद्याचे पालन काटेकोरपणे करण्याची गरज असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. वळसे पाटील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील निघोटवाडी येथील बैलगाडा घाटात बोलत होते.

पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यात जत्रा-यात्रा सुरु आहेत. या जत्रा यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. या शर्यतीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार होती. मात्र, बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी गावच्या ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या परवानगी देण्याचे अधिकार तालुका पातळीवर प्रांताधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याने ग्रामस्थांना तात्काळ परवानगी मिळत आहे.

मात्र, परवानगी मिळाल्यानंतर बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोर पालन बैलगाडा मालकांसह आयोजकांनी करावे असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केले. यावेळी उद्योजक देवेंद्र शहा, भिमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंढे-पाटील, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, विष्णुकाका हिंगे पाटील उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Mumbai : विकृतीचा कळस! मुंबईत गटारात कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, किंकाळ्या ऐकून....

Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT