Supriya sule  Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची चर्चा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री (CM) लाभणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र, या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धार्मिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत 'राज्यात चांगला पाऊस पडूदे आणि बळीराजाचं राज्य येऊदे . तसेच मी मुख्यमंत्री व्हावे की नाही ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील , असे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री (CM) लाभणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र, या चर्चेवर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत सुळे यांनी दिले आहे. ( Supriya Sule News In Marathi )

हे देखील पाहा -

चंद्रपुरात (Chandrapur) दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. यावेळी जोरगेवार यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी सुळे यांच्यांशी संवाद साधला. त्यावेळी सुळे यांना मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावेळी सुळे म्हणाल्या,' आपण २०२४ ची निवडणूक बारामती येथून लढवणार असल्याचे स्पष्ट करत आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले आहे. 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलेच्या पोटी आलेल्या कर्तृत्ववान मुलाचे काम पाहताना अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या राजकारणात काही गोष्टी 'दिलसे' कराव्या लागतात, असे त्या म्हणाल्या. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर असल्याची स्थिती असताना सुळे यांनी आमदार जोरगेवार यांच्यासाठी कुठला संदेश आणला आहे, याची आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT