Maharashtra Political, Ajit Pawar-Rohit Pawar News SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'राजकीय हवा' बिघडली! अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर रोहित पवारांचा खळबळ उडवणारा दावा

Nandkumar Joshi

अमर घटारे, प्रतिनिधी

Rohit Pawar On Ajit Pawar :

प्रदूषणामुळं मुंबईसह राज्यातील अनेक शहरांची हवा बिघडलेली असतानाच, सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून फोडण्यात येणाऱ्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या फटक्यांनी राजकीय वर्तुळातील हवाही बिघडल्याचं बोललं जातं. उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आणि राज्याच्या राजकारणात धुरळा उडाला. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर अख्खं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. पण अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं होत असतात आणि या चर्चांचे हादरे राजकीय वर्तुळात जाणवत असतात. आता पुन्हा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात रोहित पवार यांनीही अजित पवार नाराज असल्याचा दावा केल्यानं धक्क्यांची तीव्रता वाढली आहे.

अजित पवार परत येतील का, असा प्रश्न रोहित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर ते परत येतील की नाही, हा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचा प्रश्न आहे. पण अजितदादांच्या चेहऱ्याकडे बघून ते नाराज असल्याचं जाणवत आहे, असं रोहित यांनी सांगितलं.

भाजपवर निशाणा

यावेळी रोहित पवारांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपला लोकनेता आवडत नाही. त्यांच्या पक्षातले लोकनेतेही आवडत नाहीत. लोकनेत्याची ताकद भाजप कमी करते आणि तीच गोष्ट अजितदादांसोबत होत आहे, असंही ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, फुंडकर, तावडे, एकनाथ खडसे यांचीही ताकद भाजपने कमी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांचा तो व्हायरल होणारा दाखला खरा नाही- रोहित पवार

शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दाखला कथितरित्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा जो दाखला व्हायरल होत आहे तो खरा नाही. पण भाजप नेहमीच खोट्या गोष्टी पसरवत असतो. त्याचं राजकारण करतात. असत्याच्या मार्गाने सत्तेत येणे एवढेच त्यांना कळते. सत्तेत आल्यावर उन्माद करणे कळते पण लोकांचे प्रश्न कळत नाही, असे रोहित म्हणाले.

समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. सर्वसामान्यांच्या समस्या, मूळ मुद्दे बाजूला राहतात. दुसऱ्याच मुद्द्यांकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातो, असंही ते म्हणाले.

नितेश राणेंचे प्रत्युत्तर

अजित पवार नाराज असल्याचा दावा करणाऱ्या रोहित पवार यांच्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडलंय. आजकाल राज्यात चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आला आहे. अजितदादांच्या चेहऱ्यावर काय लिहिलंय? फडणवीस कुणाच्या मागे आहेत याबाबत तो सांगत आहे. स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांचा चेहरा वाचायला कधी जमले नाही, असा हल्लाबोलही राणेंनी केला.

Edited by - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT