Sunil Mane Switches from Sharad Pawar to Ajit Pawar Faction Saam Tv
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Sunil Mane Switches from Sharad Pawar to Ajit Pawar Faction: साताऱ्यात राजकीय भूकंप. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राजीनामा दिला. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Bhagyashree Kamble

  • शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाच्या वाटेवर

  • लवकरच अजित पवार गटात जाणार

  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला निर्णय - माने

ओंकार कदम, साम टिव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षातील नेत्याला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. प्रत्येत नेत्यानं या निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. अशातच साताऱ्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला झटका बसला आहे. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केला आहे. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माने यांनी नुकतंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला. लवकरच ते अजित पवार गटात पक्षप्रवेश करतील.

गेल्या काही दिवसांपासून माने यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होती. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या रहिमतपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गटात इनकमिंग सुरु असल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शहांनी घेतलं लालबाग राजाचं दर्शन

मोठी बातमी! आता बंडखोर खासदारांच्या गटातच फूट? 17 जणांनी निवडला वेगळा मार्ग

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

SCROLL FOR NEXT