बंडातात्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही; राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसचा इशारा! SaamTvNews
महाराष्ट्र

बंडातात्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही; राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसचा इशारा!

बंडातात्या जर पंढरपुरात आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या अध्यक्षा श्रेया भोसले यांनी दिला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हे देखील पहा :

बंडातात्या कराडकर यांना पंढरपुरात (Pandharpur) पाय ठेवू देणार नाही. बंडातात्या जर पंढरपुरात आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सोलापूर (Solapur) जिल्हा राष्ट्रवादी (NCP) युवती काॅंग्रेसच्या अध्यक्षा श्रेया भोसले यांनी दिला आहे. बंडातात्या कराडकर यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे लेखी निवेदन पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांना दिले आहे.

बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायाला लागलेली विकृती आहे. अशा विकृतींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. महिला विषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वारकरी संप्रदायाचा देखील त्यांनी अवमान केला आहे. त्यांना यापुढे पंढरपुरात व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाय ठेवू देणार नाही, प्रसंगी त्यांचे तोंड काळे करु इशाराही भोसले यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT