ncp sharad pawar faction andolan in dhule Saam Digital
महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, JCB वर चढून पालिका प्रशासनाला विचारला जाब

ncp sharad pawar faction andolan in dhule : पालिका प्रशासनाने काम लवकरात लवकर पूर्ण करावे व वाहनधारकांना ट्राफिकचा करावा लागणारा सामना थांबवावा अशी मागणी आंदाेलकांनी केली आहे.

भूषण अहिरे

- भूषण अहिरे

धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरामध्ये गेल्या चार वर्षांपासून भूमिगत गटारीचे काम संथ गतीने सुरू असल्याने आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने धुळ्यात आंदाेलन छेडले. या आंदाेलना प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी काही जणांनी जेसीबीवर चढून संथ गतीच्या कामाचा निषेध नाेंदविला.

भाजपा सत्ताधाऱ्यांतर्फे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. त्याचबरोबर पालिका प्रशासनाने याची दखल घेत हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली.

यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. यावेळी आंदाेलकांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून साेडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पगारातून एक रुपयाही कापला जाणार नाही, ₹२५,००० च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कडक निर्देश

Maharashtra News Live Update: मानखुर्द मार्केट रोड परिसरातून २ वर्षे ४ महिन्यांचा चिमुकला बेपत्ता

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT