Nashik NCP Office  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Political News : नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने; पोलासांचा मोठा बंदोबस्त

NCP activist conflict : शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत

अभिजीत सोनावणे

Nashik News : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे.

मात्र पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाकडे असा पेच पुन्हा निर्माण झाला आहे. याशिवाय राष्ट्रवादीची राज्यभरातील कार्यालयांवर दावा करण्यासाठीही चढाओढ सुरु झाली आहे. नाशिकमध्येही कार्यालयावरुन अजित पवार, छगन भुजबळ समर्थक आणि शरद पवार समर्थक आमने-सामने आले आहेत. (Latest Marathi News)

शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक घेण्यावर ठाम आहेत. मात्र बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा इशारा अजित पवार आणि भुजबळ गटाने त्यांना दिला आहे. (Breaking News)

भुजबळ समर्थकांनी सकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नाशिक लोकसभेचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन बैठक घेऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे.  (Latest Political News)

कार्यालयाच्या ताब्यावरून होणारा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा पाऊस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. दंगा नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

SCROLL FOR NEXT