पुण्यातील सय्यदवाडी येथे रेल्वे प्रशासनाविरुद्ध राष्ट्रवादीचा रेल रोको! SaamTvNews
महाराष्ट्र

पुण्यातील सय्यदवाडी येथे रेल्वे प्रशासनाविरुद्ध राष्ट्रवादीचा रेल रोको!

दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता, यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करण्यास रोखून धरले.

हे देखील पहा :

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि माजी नगरसेवक फारूक इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपची सत्ता पालिकेत आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने हे गेट बंद केले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून हे गेट आहे, हे गेट बंद केल्यामुळे दोन लाख नागरिकांची गैरसोय होत आहे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.

आसपासच्या बारा वाड्यामधील नागरिक या गेटने ये-जा करतात येथील व्यावसायिक रिक्षा चालक यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे, हे गेट खुले न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT