sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

MVA Morcha : शरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार; काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharad Pawar News : भाजपच्या (BJP) नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.

तब्बेतीच्या कारणामुळं शरद पवार मविआच्या सभेस्थळी उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारहे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत.  त्यामुळे आता शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून ठिकठिकाणी बॅनर आणि महाविकास आघाडीचे झेंडे लावण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT