Former MLA Farooq Shah addressing NCP workers during a meeting in Dhule ahead of municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

NCP Dhule Municipal Election: धुळे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी जाहीर केली आहे. फारुक शहा यांनी “महापौर आमचाच” असा ठाम दावा करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसने धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे.

माजी आमदार फारुक शहा यांनी स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी जाहीर केली.

बैठकीत “महापौर आमचाच होईल” असा ठाम दावा करण्यात आला.

स्वबळाच्या भूमिकेमुळे महायुतीतील तणाव वाढल्याचे संकेत आहेत

भूषण आहीरे, साम टीव्ही

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी केली असून, मनपा निवडणुक स्वबळावर लढण्याची आमची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे माजी आमदार फारुक शहा यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकी नंतर स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर वरिष्ठांचा आदेश आला तर त्यावेळी त्या पध्दतीने भुमीका घेतली जाईल. परंतु आमची तयारी स्वबळाची आहे. आणि महापौर आमचाच होईल असा दावा देखील धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा निवडणुक प्रभारी फारुक शाह यांनी केला आहे.

आगामी धुळे महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निवडणुकीच्या रणनीतीवर विचारविनिमय करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाने गठित केलेल्या समितीची बैठक संपन्न झाली.समितीचे अध्यक्ष फारूक शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला माजी आमदार शरद पाटील त्याच बरोबर मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये चुरस दिसून येत आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महायुतीचा नारा देत आहे, तर दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते हे स्वबळाचा नारा देत असून धुळेमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर महापालिकेवर आपलाच महापौर राहील असा दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच मित्रपक्षांमध्ये वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT