Sharad Pawar, Devendra Fadnavis SAAM TV
महाराष्ट्र

Nagpur Politics: फडणवीसांच्या नागपुरात राष्ट्रवादीचा नवा प्लान; शरद पवारांच्या सूचनेनंतर पक्षातील नेते सक्रिय

Nagpur Politics: राष्ट्रवादीने शरद पवारांच्या सूचनेनंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

संजय डाफ

Nagpur News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने देखील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीने राष्ट्रीय कार्यध्यक्षांची निवड केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या सूचनेनंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या आदेशानं फडणवीसांच्या नागपुरात राष्ट्रवादीने प्लान तयार केला आहे.

'वन बुथ टेन युथ'च्या फॅार्म्युल्यानुसार नागपुरात राष्ट्रवादीने बूथ बांधणी सुरु केली आहे. एका बुथवर १० तरुणांची फळी तयार करायची असं नियोजन राष्ट्रवादीनं केलं आहे . आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचं 'वन बुथ टेन युथ'च्या फॅार्म्युल्यानुसार पक्षबांधणी सुरु केली आहे.

आतापर्यंत नागपूरातील २५० बुथवर बांधणी केली असून आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी तयारी करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या जागांवरंही राष्ट्रवादी निवडणूक तयारी करत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी ही माहिती दिली आहे. (Nagpur Political News)

शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांना गुगली

शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. शरद पवार म्हणाले की, २०१४ सालची निवडणूक झाल्यानंतर भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. मात्र ते देण्या मागं आमचं काही करणं होतं.'

'यानंतरच्या काळामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे, आमच्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली. ही गोष्ट खरी आहे. पण काल त्यांनी स्वतःच सांगितलं आहे, याबाबत मी दोन दिवसांनी धोरण बदललं. मग शपथ घायचं दोन दिवसांनी काय कारण होतं आणि ती चोरून पहाटे घेण्याचं काय कारण? असा सवाल करत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT