Amol Kolhe News Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar Rally in Beed : अमोल कोल्हेंची शरद पवारांच्या बीडमधील सभेला दांडी, राजकीय चर्चांना उधाण

Political NEws : प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी असताना कोल्हेंची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहिदास गाडगे

Beed News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा आज बीडमध्ये पार पडणार आहे. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर दुसरी आणि मराठवाड्यातील ही पहिली सभा असणार आहे. या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र शरद पवारांच्या या सभेला राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रचारक अमोल कोल्हे मात्र गैरहजर असणार आहे.

पुर्व नियोजित कार्यक्रम असल्याने सभेला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कारण अमोल कोल्हेंकडून देण्यात आलं आहे. मात्र प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी असताना कोल्हेंची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरत आहे. (Maharashtra News)

शरद पवारांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन येवल्याच्या सभेत अमोल कोल्हेंनी दिले होते. मात्र तेव्हापासून अमोल कोल्हे शरद पवारांसोबत दुसऱ्या सभांमध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांची होणार उत्तर सभा

शरद पवारांची बीडमध्ये सभा पार पडल्यानंतर 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली आहे. शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येईल, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT