Rohit Pawar
Rohit Pawar saam tv
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील ती बातमी वाचून Rohit Pawar यांच मन अस्वस्थ झालं

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा (satara) जिल्हा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) यांचा एक अतूट नातं आहे. हे वेळाेवेळी विविध घटनांच्या माध्यमातून दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) हे जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे देखील जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे हे वेळाेवेळी ते विकास निधीच्या वाटपावरुन सिद्ध झाले आहे. आता पवार घराण्यातील नवी पिढीतील आमदार राेहित पवार यांचे ही सातारा जिल्ह्यावर प्रेम जडले आहे. जिल्ह्यात घडणा-या चांगल्या वाईट गाेष्टींचे आमदार राेहित पवार (rohit pawar) हे आवर्जुन कार्यकर्त्यांना विचारपूस करीत असतात. (ncp mla rohit pawar tweets about koyna dam earthquake incident)

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (Koyna Dam) परिसरात शनिवारी २.९ रिश्टर स्केल इतका भूकंपाचा (earthquake) धक्का बसला हाेता. याच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच हेळवाक गावाच्या नैऋत्येस सहा किलाेमीटर होते. या धक्क्यामुळे काेठेही नुकसान झाले नाही असे प्रशासनाने नमूद केले हाेते.

सातारा (satara) जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात काल दुपारी भूकंपाचे सौम्य हादरे बसल्याची बातमी वाचून मन अस्वस्थ झालं. पण सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं ट्विट आमदार राेहित पवार यांनी केले आहे. आमदार पवार यांच्या या ट्विटने त्यांचे सातारा जिल्ह्यावर लक्ष असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मुसळधार पावसामुळे काेसळलेल्या संकट काळात आमदार पवार हे पाटण तालुक्यातील नागरिकांसाठी धावून आले हाेते याची देखील आठवण या निमित्ताने हाेत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT