Ajit PAwar-Nilesh Lanke Saam TV
महाराष्ट्र

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवरून आमदार निलेश लंकेंचं धुमजाव, आता म्हणतात...

धाराशिव जिल्ह्यातील संजीपूर येथे जल जिवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपूजन कार्यक्रमासाठी आले होते.

साम टिव्ही ब्युरो

>> कैलास चौधरी

धाराशीव : अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली होतं. मात्र त्यांनी आता आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हे कुटुंब असून यात कोणती जबाबदारी कोणाला द्यायची याचे सर्व अधिकार कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना आहेत, असं म्हणत निलेश लंके यांनी आपल्या मागणीवरुन धुमजाव केले आहे.

आमदार निलेश लंके हे धाराशिव जिल्ह्यातील संजीपूर येथे जल जिवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपूजन कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले होते निलेश लंके?

आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचे आहे. अजित दादांच्या काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवाची आहे. हे काम येत्या वर्षभरात करायचे आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपले राज्य 25 वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असं निलेश लंके यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : या राशीची भरभराट होणार, तर काहींचा आजार वाढणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

SCROLL FOR NEXT