Jitendra Awhad News: Saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad News: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'सिल्वर ओक'वर काय चर्चा झाली? जितेंद्र आव्हाड म्हणाले...

Jitendra Awhad News: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. याचदरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे

Jitendra Awhad News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'सिल्वर ओक' वर भेट झाली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साडेचार वाजण्याच्या दरम्यान भेट झाली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. याचदरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं. दोघांच्या भेटीत राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच या बैठकीवेळी उपस्थित होतो, अशीही माहिती त्यांनी दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवरही आव्हाड यांनी भाष्य केलं.

'छगन भुजबळ यांची भूमिका पहिल्यापासून ठरलेली आहे. त्या विषयावर या नेत्यांनी चर्चा करावी हे संयुक्तिक वाटत नाही. मी बोलल्या सारखं करेन, तू रडल्यासारखं कर.मी मारल्यासारखं करेन, तू हसल्यासारखं कर. हेच सराकारमध्ये सुरु आहे. त्यांच्या पायाखालील जमीन सरकलेली आहे. आता दोन समाज एकमेकांना कसे भिडतील याचा प्रयत्न सुरु आहे. ही बाब ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्या दोघांनाही लक्षात येत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

दरम्यान, राज्यात दिवाळीनंतर ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

'मी ओबीसी आहे. मी कधी लपवलेले नाही. पण मी यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करेल का, तर करणार नाही. मराठा समजाची स्थिती घसरत चालली आहे. ती सावरण्याची आवशक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे.

तसेच आजच्या बैठकीत काँग्रेसचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. यावरही आव्हाड यांनी भाष्य केलं. 'आजची बैठक व्यक्तिगत पातळीवर होती. काँग्रेसचा नेता येण्याचा विषयच नाही, असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

SCROLL FOR NEXT