Sharad Pawar vs Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय!

Maharashtra Politial Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. २९ जानेवारी २०२४

NCP MLA Disqualification Case:

राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षावर सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती, मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार (AJit Pawar) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्या अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) दिले आहेत. राहुल नार्वेकरांनी निकालासाठी वेळ वाढवून देण्यासाठी कोर्टात ४ दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण बंद होईल, अशी हमी वकिल तुषार मेहता यांनी दिली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घडाळ्याचा निकाल या आठवड्यात येणार?

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशामुळे राष्ट्रवादी चिन्ह अन् पक्षाचा निकाल (NCP Party And Symbol) या आठवडयात कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्याआधारेच त्यांचा निकाल देऊ शकतात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT