Dhananjay Munde On Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा; धनंजय मुंडेंचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज

सभागृहातील मुख्यमंत्र्याच्या टोलेबाजीला धनंजय मुंडेंनी जाहीर भाषणातून प्रत्युत्तर दिले.

विनोद जिरे

बीड: पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना करुणा मुंडे यांना उद्देशून टीका केली होती, यावर आता माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे (Eknath Shinde) म्हणाले, संघर्ष माझ्या पाचवीलाचं पूजलेला आहे, राजकीय, कोविड यासह अनेक संकटे माझ्यावर आली आहेत. मात्र, तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणून जगात मी कुणालाही भीत नाही, असं म्हणत सभागृहात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टोलेबाजीला धनंजय मुंडेंनी परळीत नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये राहत इंदोरी यांचा शेर बोलत प्रत्युत्तर दिले.

"राहमें खतरे कितने भी हो, लेकिन ठहेरता कौन है.. मौत कल आती है आज आजा ये, अरे डरता कौन है..तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा, मरता कौन है, असं म्हणत धनंजय मुंडेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, माझी आपल्याला कळकळीची फक्त एवढीच विनंती आहे, आपण सत्तेत असू नसू लोकांच्या अनेक टीकेला मी तोंड दिले आहे. संघर्ष जीवनात माझ्या पाचवीलाच पूजला आहे. ज्या -ज्या वेळेस माझ्यावर संकट आले, त्या संकटांमध्ये माझे ज्या- ज्या वेळेस हात पाय गळत होते त्यावेळेस मला प्राण म्हणून माझ्या जिवात जीव म्हणून ज्या कुणामुळे येत होता तो फक्त या समोरच्या माझ्या मायबाप जनतेमुळे येत होता, असं म्हणत धनंजय मुंडे (Eknath Shinde) यांनी परळीकरांना भावनिक साद देखील घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

April Grah Gochar: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ग्रहाचं गोचर; बुधादित्य राजयोग एका रात्रीत पालटणार नशीब

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हाल

Maharashtra News Live Update: दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले - देवेंद्र फडणवीस

युद्ध पुन्हा पेटण्यास होर्मूझ कळीचा मुद्दा, अमेरिकन नौदलाकडून कडक नाकेबंदी

High blood pressure symptoms: रात्रीच्या वेळी ही लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय

SCROLL FOR NEXT