Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

दादा हिमालयात जायची तारीख सांगा, मीही सोबत येतो; NCPच्या आमदाराचं विधान

''चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून ते या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे.''

जयेश गावंडे

अकोला: आज हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांची गदा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोबत असून ही गदा कोल्हापूरकरांनी भाजपच्या टाळक्यात मारली असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही खोचक टीका केली आहे.

कोल्हापूर पोट निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाल्यास हिमालयात निघून जाईल असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजकारण सोडून हिमालयात जाण्याची तारीख सांगावी कारण मी ही त्यावेळेस शब्द दिला होता की, मी त्यांच्या सोबत टाळ, मंजिरा आणि रुद्राक्ष माळ हे साहित्य घेऊन हिमालयात त्यांना सोडण्यासाठी जाईल असे आमदार मिटकरी म्हणाले. चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असून ते या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असल्याची टीका ही मिटकरी यांनी केलीय.

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला आहे. आता या निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचे हिमालयात जाण्याचे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोट निवडणूक लावावी निवडून नाही आलो तर राजकारणातून सन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईल अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चंद्रकांत पाटलांसाठी (Chandrakant Patil) हरिद्वारचे थ्री टायर एसी तिकीट बुक करण्यात आले आहे. सध्या उन्हाळा त्यांना त्रास होऊ नये म्हणून एसी तिकीट बुक केल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने सांगण्यात आले आहे. तिकीटाबरोबर जेवनाचीही सोय करण्यात आल्याचं राष्ट्रवादीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT