Jayant Patil  Saam TV
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : मंत्रालयात झाली बैठक, जयंत पाटील यांनी दिल्या 'या' सूचना

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसाठी आज मंत्रालय परिषद सभागृहात बैठक पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत (Maharashtra-karnatak border issue) सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यासंदर्भातील कामकाजास गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री आणि तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज दिल्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसाठी (Petition) तज्ज्ञ समितीची आज बैठक पार पडली.

मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा समितीच्या सदस्य सचिव सुजाता सौनिक, सदस्य ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर, विशेष निमंत्रित ॲड. पाटील, ॲड. शिवाजी जाधव, ॲड.संतोष काकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबत पूर्वतयारी करावी. आवश्यक असल्यास ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करावे.ज्येष्ठ विधीज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीतही बैठक घेण्यात यावी,अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली. यावेळी बैठकीत ॲड.शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबतची वस्तुस्थिती सादर केली. सदस्य ॲड.र.वि.पाटील,दिनेश ओऊळकर,ॲड.राम आपटे यांनीही या बैठकीत मते मांडली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

पावसाळ्यात मिळणारी गावरान आघाड्याची भाजी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खातच राहाल

SCROLL FOR NEXT