Jayant Patil  Saam TV
महाराष्ट्र

...तर मी दिलगिरी व्यक्त करतो; अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यामुळं (controversial statement) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथील जाहीर ब्राह्मण समाजाची ((Brahmin communities) आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर पुण्यात ब्राम्हण महासभेने आंदोलनाचा पवित्रा घेत मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकरणी मिटकरी यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल करा, अशी तक्रार परशुराम सेवा संघातर्फे वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्याने राजकीय वातावरण तापलं असून त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. ते माझ्या व्यसपीठावरुन बोलल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

पाटील आमदारांच्या वैद्यकीय बिलांबाबत बोलताना म्हणाले, मंत्र्याची, आमदारांची वैद्यकीय बिलं देण्याची पद्धत जुनीच आहे, सर्वच जण या योजनेचा लाभ घेतात. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचाही पाटील यांनी समाचार घेतला. भाजपा हा पक्ष 5 हजार वर्षांपूर्वीचा आहे, असं चंद्रकांतदाद म्हणत असतील, तर त्याला माझा 100% पाठिंबा आहे, अशी खोचक टीकाही पाटील यांनी चंद्रकांत दादांवर केलीय.

राष्ट्रवादीचे परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी अमोल मिटकरींना घरचा आहेर दिला आहे. वाचाळवीरांमुळे पक्षाची बदनामी होते. अशा वाचाळविरांमुळे कार्यकर्ता म्हणून त्रास होतो. लोकांना उत्तर देताना अडचण होते, मतांचा टक्का घसरतो असं धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. या सोबतच पक्षश्रेष्ठीही मिटकरी यांच्या वक्तव्याने दुखावले गेले असल्याची माहिती दिली. अमोल मिटकरी मानधन घेवून भाषण करणारे आहेत. पक्षात त्यांना २ वर्षे झाले आहे. मुरायला वेळ लागेल. मिटकरींची आमदार पदावरून हकालपट्टी करावी त्यांना विधिमंडळात स्थान देवू नये अशी धर्माधिकारी यांनी मागणी केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT