Ncp Merger Update: Cm Devendra Fadnavis Breaks Silence On Sunetra Pawar Meeting saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

NCP Merger Buzz: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर महत्त्वाचे विधान केलंय. विलीनीकरणाबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याचं फडणवीस म्हणालेत.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलीनीकरणच्या चर्चेवर पडदा टाकलाय. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू होता. दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांच्या भेट, त्यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच या बैठकीला महत्त्व आलं होतं.

सुनेत्रा पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. सुनेत्राताई शासकीय कामकाजनिमित्त आमच्याकडे आल्या होत्या, आमच्यात कुठेही विलीनीकरणाची चर्चा नव्हती, मी पुन्हा एकदा सांगतो, विलनीकरण संदर्भात काही चर्चा असते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केलीच असती, कारण आम्ही सत्तेत आहोत.

सध्या विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नाही, त्यांनी विलीनीकरणाची चर्चा सुरू केली असती तर त्यांनी असं सांगितलं असतं की विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. या चर्चा केवळ मीडियात ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात अशा पद्धतीने आम्हाला कोणीही असं सांगितलं नाही. म्हणून त्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. आजच्या चर्चेत सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नव्हती.

तुम्ही आज सुप्रियाताईंची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे। की डीलिमिटेशन बीलला आमची मान्यता आहे। 50 टक्के फ्लॅट सीटा वाढवून मागच्या वेळेस जे बिल आलं होतं. तशा पद्धतीचा बिल आलं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा पूर्ण समर्थन देईल ,असा सुप्रियाताईंनी सांगितल. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, आणि पतंगबाजी सुरू आहेत ते पतंगबाजी बंद झाली पाहिजे, असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT