विलिनीकरणावरून महाराष्ट्रात राजकीय चर्चा सुरू आहे.
विलिनीकरणाच्या प्रक्रियेत भाजपची भूमिका महत्त्वाची मुख्यमंत्र्यांचं विधान
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची 2 नोव्हेंबरला भेट झाली आणि याचं भेटीनंतर आता भाजप हायकमांडनं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे.अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अनौपचारिक चर्चांमध्ये महत्त्वाचं विधान केलयं. फडणवीस नेमकं काय म्हणाले ऐका.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल दोन लोकचं सांगू शकतात. एक शरद पवार आणि दुसऱ्या सुनेत्रा वहिनी.. बाकी विलिनीकरणाबद्दल कोणीच सांगू शकत नाही. मात्र आमच्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याचे ठरवलं तर आम्हाला सांगतीलच.
मुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं चांगलाच जोर धरलाय..प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतलेली भेट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण व्हावं अशी दादांची इच्छा होती, असं खासदार सुनील तटकरेंनी केलेलं विधानं. या सगळ्या गोष्टींमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलयं. अशातच सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू असं पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना फोनवर सांगितलं.
त्यामुळे विलिनीकरणात भाजपची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचीही चर्चा आहे. त्यात सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतल्यानंतर राजेश टोपेंनीही विलिनीकरणाच्या चर्चा आधी झाल्या होत्या. मात्र दादांच्या राष्ट्रवादीनं चर्चा नाकारल्यानं आम्ही शांत राहिलो, अस विधान केलयं.
दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनीही शरद पवारांची 11 नोव्हेंबरला भेट घेण्यासाठी वेळ मागितलीय. त्यामुळे नेतृत्वावरचा दबावही वाढत चालला आहे आणि मविआत अस्वस्थता निर्माण झालीय. विलिनीकरणाचा जोरदार चर्चा सुरू झाल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे चर्चा करणारे वेडे होतील असा खोचक टोला ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय. त्याला भाजपनेही चांगलचं प्रत्युत्तर दिलंय.
दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांनी विलिनीकरणाची इच्छा नेतृत्वाकडे व्यक्त केलीय. त्यात केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी भाजप सुनेत्रा पवारांवर विलिनीकरणासाठी दबाव टाकत असल्याचीही चर्चा आहे.. मात्र सुनेत्रा पवार दबावाच्या राजकारणानंतर विलिनीकरणाची भूमिका घेणार का? शरद पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला मान्यता देणार का? खरचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दोरी भाजपच्या हातात आहे का? हे येणारा काळच सांगेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.