Kolhapur, Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar In Kolhapur: शरद पवारांचे 'ते' वक्तव्य हसन मुश्रीफांना बाेचले? नेत्याच्या भेटीला सीमा भागातील शिष्टमंडळ दाखल

sharad pawar marathi news : आज दिवसभर शरद पवार यांचे काेल्हापूरात कार्यक्रम आहेत. त्यानंतर ते पुण्याला रवाना होणार आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पवार यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पवार यांच्या भेटीला आज सीमा भागातील शिष्टमंडळ कोल्हापूरात दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

सीमा प्रश्न संदर्भात शरद पवार यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आलाे आहाेत अशी माहिती सीमावासियांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान पवार हे काेल्हापूर जिल्ह्यातील विविध शिष्ट मंडळ आणि कार्यकर्त्यांची देखील भेट घेणार आहेत.

त्यांनतर शरद पवार हे दुपारच्या सुमारास टाऊन हाॅल येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करतील. दुपारी साडे तीन वाजता महासैनिक दरबार हॉल येथे आयोजिलेल्या हिंदू मजदूर संघ या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे.

मुश्रीफ आज त्या विधानावर बाेलतील?

काेल्हापूरात शुक्रवारी शरद पवार यांनी सभेतील भाषणात हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले. मुश्रीफ हे ईडीला घाबरले (Hasan Mushrif Fears Of ED Says Sharad Pawar) असे पवारांनी म्हटलं. यामुळे मुश्रीफ आज पवारांच्या विधानावर काय बाेलणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

SCROLL FOR NEXT