Rohit PAwar Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar News : रोहित पवारांकडून CM एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्याचं 'ऑपरेशन'; तानाजी सावंतांवरही साधला निशाणा

Rohit Pawar on CM Eknath Shinde: दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे डॉक्टरला किती वेळ ठेवायचं, किती महत्व देतील हे देखील पाहावं लागेल

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डी लिट पदवीवरून निशाणा साधला आहे. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट पदवी देत असताना अभ्यास नक्कीच केला असेल, असा टोला लगावत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली पदवी त्यांच्या कार्यामुळे दिली असेल, त्याचा मान सन्मान आपण सर्वांनीच केला पाहिजे. मी याआधीच छोट मोठे ऑपरेशन केल्याने मी आधीच डॉक्टर झालो होतो, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होत.

यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, ऑपरेशन केलं तर दीर्घकाळ पेशंटला मदत होते. मात्र चुकीचं ऑपरेशन केलं तर पेशंट अडचणीत येऊ शकतो, तर कदाचित डॉक्टरही अडचणीत सापडू शकतो. दवाखाना भाजपचा आहे त्यामुळे डॉक्टरला किती वेळ ठेवायचं, किती महत्व देतील हे देखील पाहावं लागेल, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तानाजी सावंत म्हणाले की शिवसेनेतील बंडाआधी दीडशेहून अधिक बैठका घेतल्या. तर त्यांची इतकी क्षमता आहे का? हे आपल्याला बघावं लागेल. तसेच सोलापूरमध्ये ते अनेक आमदार निवडून आणणार होते किती आमदार निवडून आणले याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

शिवसेना फुटत असताही शिवसेना पक्षाचा हा अंतर्गत विषय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या सर्व घडामोडींच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं उघडपणे सांगितलं होतं. आता यात आता तिसरा कलाकार आलाय ते म्हणजे तानाजी सावंत. आता हे तीन कलाकार आणि आणखी किती कलाकार असतील हे सांगता येत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT