Rajesh Tope  Saam TV
महाराष्ट्र

Rajesh Tope Car Attacked : माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

Rajesh Tope Car Attacked : पाच ते सहा जण दुचाकीवरून आले होते. हल्लेखोरांनी लाठीहल्ला आणि दगडफेक केली. तसेच काळं फासण्याचा प्रयत्नही केला.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Rajesh Tope Car Attacked :

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना आज, शनिवारी घडली. पाच ते सहा जण दुचाकीवरून आले होते.

हल्लेखोरांनी लाठीहल्ला आणि दगडफेक केली. तसेच काळं फासण्याचा प्रयत्नही केला. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस पथकासह घटनास्थळावर पोहोचले आहेत.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक आणि उपसंचालकपदाची निवड होती. ही निवड बिनविरोध झाली होती. मात्र या दरम्यान काही जणांनी राजेश टोपे यांच्या कारला लक्ष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)  

हल्ला झाला त्यावेळी कारमध्ये राजेश टोपे यांचा चालक होता. राजेश टोपे हे निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेत गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. (Latest Marathi News)

हल्ल्यादरम्यान कारवर शाई, दगड फेकण्यात आले. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या कारचेही नुकसान झालं आहे. निवडणूक बिनविरोध झालेली असताना काही लोकांनी हिंसक मार्ग पत्करला. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra By-Election: राहुरीत महायुतीचा उमेदवार ठरला; महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची चर्चा?

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत

Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

SCROLL FOR NEXT