Jitendra Awhad News  Saam Tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad : 'भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल'; जितेंद्र आव्हाडांनी करनी सेनेला इशारा का दिला?

'करनी सेना भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास त्यांचा खिमा होईल, असा इशार आव्हाड यांनी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Jitednra Awhad News : कोरेगाव भीमा येथील १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला करणी सेनेनं विरोध केल्यानं नवा वादाला तोंड फुटलं आहे. शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला आहे. 'करनी सेना भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास त्यांचा खिमा होईल, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी करनी सेनेच्या मागणीचा खरपूस समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'भीमा कोरेगावचा इतिहास माहित नाही त्यांनी वक्तव्य करू नये. या प्रकारची विधान करून समाजातील कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. बाहेर राज्यात बसलेल्यांनी महाराष्ट्रातल्या विषयावर चर्चा करू नये'.

'जे पेशवे करू शकले नाही आणि हा काय करणार. आमच्या हक्काचा आणि शौर्याचा दिवस आहे. करनी सेना आणि फर्निसेना यांनी येऊन दाखवावं. करनी सेना नाही ही पळपुटी सेना आहे. भीमा कोरेगावला एक तारखेला आल्यास खिमा होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

शौर्य दिनाला महाराष्ट्र करणी सेनेचा विरोध का आहे?

इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा उदो उदो होता कामा नये, अशी भूमिका सेंगर यांनी घेतली. कोरेगाव भीमाची ही लढाई जातीय लढाई नव्हती, इंग्रजांना पुण्यावर कब्जा मिळवण्याकरता एक छोटीशी चकमक झाली होती.

परंतु वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आपली राजकीय चूल पेटवण्याकरता या छोट्याशा चकमकीला जातीय स्वरूप देत आहे आणि हिंदू - बुद्ध यांच्यात दरी निर्माण करत आहे, यांचा सेंगर यांनी निषेध केला.

हिंदू धर्म आणि बुद्ध धर्मात कलह निर्माण करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडू असे सेंगर म्हणाले. कोरेगाव भीमा दिनाच्या खोट्या कथा सोशल मीडियावर टाकून माथे भडकवण्याचे काम सुरू आहे. इंग्रजांकडून लढणे हे काय शौर्य नाही म्हणून या शौर्य दिवस कार्यक्रमाला आमचा विरोध असेल असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra Live News Update: देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT