vijay shivtare and eknath khadse  saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांवर आरोप करणं हा एक मूर्खपणा; एकनाथ खडसेंचे विजय शिवतारेंना जोरदार प्रत्युत्तर

विजय शिवतारेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

प्रदीप भणगे

Eknath khadse News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेना संपवायला शरद पवार(Sharad Pawar) जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शिवतारे यांच्या आरोपानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विजय शिवतारेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

डोंबिवलीत एका कार्यक्रमात खडसे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवतारे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खरपूस समाचार घेतला. एकनाथ खडसे म्हणाले, 'शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठी केली. त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवार यांच्यावर आरोप म्हणजे एक मूर्खपणा आहे'.

'शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली. या रज्यामध्ये सत्ता आणली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र सरकार आलं आणि ते चाललं. आता सुरू असलेलं राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले होते विजय शिवतारे?

'शिवसेना संपवायला राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) जबाबदार आहेत. सगळा दोष पवार साहेबांचा आहे. स्वतःचा फायदा करून घ्यायचा. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले, असे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT