राष्ट्रवादीच्या नेत्याची महिला ग्रामपंचायत सदस्यास मारहाण; मारहाणीचा Video व्हायरल Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्याची महिला ग्रामपंचायत सदस्यास मारहाण; मारहाणीचा Video व्हायरल

महिला सदस्य विशाखा धुरंधर ह्या कामानिमित्त जात असताना राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाने आपल्या साथीदारांसह मारहाण केली असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अंबादास हिंगणे (NCP Leader Ambadas Hingane) यांनी तालुक्यातील आमसरी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यास अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा घटना घडली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भारत लाहुडकर हे एका हत्या प्रकरणात कारागृहात आहेत. आता अशातच नवनियुक्त राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाने महिलेस मारहाण करून अजूनही तालुक्यात राष्ट्रवादीची दादागिरी दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे.

हे देखील पहा -

आमसरी येथील महिला सदस्य विशाखा धुरंधर ह्या कामानिमित्त जात असताना NCP तालुका अध्यक्षाने आपल्या साथीदारांसह मारहाण केली असा आरोप पीडित महिलेने केला आहे. यावरून जलंब पोलिसांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे सह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अध्याप कुणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Maharashtra News Live Update: - कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका, सरकार कारवाई करणार; आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT