Jayant Patil, Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil : 'त्या' भीतीमुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडला; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला चिमटा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

विजय पाटील

सांगली : मंत्रीमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रीपद मिळाले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार फुटतील, या भीतीतूनच मंत्रीमंडळ विस्तार रखडला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगलीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असे सांगत असले तरी जोपर्यंत मुख्यमंत्री याबाबत घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत यामध्ये तथ्य आहे असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.

पहिला टप्प्यात मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रीपद न मिळाल्याने उर्वरित आमदार पुन्हा ठाकरे यांच्याकडे परततील यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ कमी होण्याची भीती असल्याने मंत्रीमंडळ विस्तार टाळला जात आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा याच्यात सुरू असलेल्या वादावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 'बच्चू कडू यांच्यावर जे आरोप झाले, यावरून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काही नवल वाटण्यासारखे नाही. खोके घेतल्याचा आरोप होउनही कडू गप्प का बसले आहेत ? त्यांनी ठामपणाने भूमिका घेतली नसल्याने राणा यांनी केलेल्या आरोप चुकीचा वाटत नसल्याचे दिसते', असेही पाटील म्हणाले

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवविवाहित सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा संशयास्पद मृत्यू,नवऱ्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

RCB vs GT IPL 2026 Final: जॉश बटलर १९ धावांवर बाद, ७३ धावांवर गुजरातनं गमावला ४ गडी

Maharashtra News Live Update: सोलापूर विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

Chanakya Niti : बायकोच्या या 5 गोष्टी डोळे झाकून मान्य करणं ठरेल धोकादायक, चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

विधानपरिषद निवडणुकीत मोठं काहीतरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना दिल्या महत्वाचा सूचना|VIDEO

SCROLL FOR NEXT