Sharad Pawar and Ajit Pawar likely to unite again for upcoming municipal elections in Maharashtra amid growing talks of NCP reunion against BJP. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Sharad Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत...मात्र कोणत्या पालिकांसाठी युती होणार आहे... आणि भाजपविरोधात पवार काका-पुतण्याची स्ट्रॅटजी नेमकी काय आहे?

Bharat Mohalkar

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात रणशिंग फुंकलं.. मात्र कोल्हापूरच्या चंदगडनंतर पवार काका -पुतण्या थेट होमपिच बारामतीत एकत्र येण्याची शक्यता आहे...कारण माळेगाव नगरपंचायतीत भाजपच्या तावरेंनी पारंपरिक विरोधक अजित पवार आणि शरद पवारांविरोधात दंड थोपटलेत...

त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बारामतीत एकत्र येण्याची चर्चा आहे.. मात्र त्याआधीच एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत... याच वेळी अजित पवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.. एवढंच नाही तर पिंपरी चिंचवडमध्येही भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची तयारी केलीय..

ही चर्चा फक्त बारामती, पिंपरी चिंचवडपुरती मर्यादित नाही... तर शिरुर, अंबाजोगाई आणि जेजुरी नगरपरिषदेतही युतीची चर्चा रंगलीय.. आणि त्याला कारण ठरलंय पुरंदर विधानसभा मतदारसंघातील बदललेलं समीकरण.... कारण काँग्रेसचे संजय जगताप भाजपवासी झालेत.. त्यामुळे बदललेल्या समीकरणाचा फायदा मिळण्याच्या आशेने जेजुरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे...

आता अजित पवार भाजपसोबत महायुतीत सत्तेत असतानाच काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधत आहेत...त्यामुळे जेजुरीतून युतीचा भंडारा उधळून आगामी काळात पवार काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

SCROLL FOR NEXT