NCP Party Symbol Case: Ajit Pawar Vs Sharad Pawar Who Will Get Ncp Party Clock Symbol Know What Happened in Today's Court Hearing Saam Digital
महाराष्ट्र

NCP Party Symbol Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार? कोर्टात आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Court Hearing on NCP Party Symbol Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्यणयावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार होती, ऐन निवडणुकीत होणाऱ्या या निवडणुकीडे राज्याचं लक्ष लागल होतं, मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे यावर सुनावणी होऊ शकली नाही. आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हबाबदचं प्रकरण प्रकरण 44 नंबरला लिस्टेड होत. मात्र आज कोर्टाचं काम हे 16 व्या प्रकरणापर्यंतचं चालल्याने हे प्रकरण बोर्डावर आलचं नाही. आता कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे या सुट्ट्या संपल्यानंतरच प्रकरणावर सुनावणी होणार आहे. म्हणजे जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी लांबली आहे.

न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार होती. राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिलं आहे, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने याचिकेत म्हलटं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान ऐन निवडणुकीत सुनावणी होणार होती त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. आता जुलै महिन्यात कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय एकतर्फी असल्याचं म्हटलं आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

SCROLL FOR NEXT