mla nitesh rane , devgad nagar panchayat saam tv
महाराष्ट्र

Devgad Jamsande Nagar Panchayat : काेकणातून 'मविआ' ला दूसरा दणका; NCP च्या मिताली सावंत BJP च्या गाेटात

दोनच दिवसांपुर्वी एक सदस्य अपात्र ठरले हाेते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Mla Nitesh Rane News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सत्ताधारी ठाकरे सेना व राष्ट्रवादी गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सकाळी लांजा येथे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या पुर्वा मुळे यांच्यावरील अविश्वास ठराव 13- 0 ने जिंकला. त्यामुळे आज शिंदे गटासह भाजपने मविआला दाेन माेठे धक्के दिल्याची चर्चा सुरु आहे.

(Maharashtra News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत (ncp corporator mitali sawant) यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाचे 8 आणि मिताली सावंत असे एकूण 9 तर शिवसेनेचे 7 असे बलाबल झाले आहे.

शिवसेना (shivsena) ठाकरे गटाचे रोहन खेडेकर हे नगरसेवक दोनच दिवसांपुर्वी पदाचा दुरुपयोग करून अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणात अपात्र ठरल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाचे 8 आणि सत्ताधारी सेना राष्ट्रवादी गटाचे 8 असे बलाबल झाले होते.

मात्र आता राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांनी सेनेच्या गटाची साथ सोडत भाजपला समर्थन दिल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपाची सत्ता आली आहे. यासर्व नाट्यमय घडामोडीत कणकवली- देवगड मतदार संघाचे आमदार नितेश राणे हे किंग मेकर ठरले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT