Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: निकाल बघितलाय, आता... पुढील तयारी; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली रणनिती

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचा २५वा वर्धापनदिनाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, निकाल बघितला आहे. कुठं कमी पडलो, हे विचारात घेऊन पुढची तयारी करायची आहे. तरूणांचे नेतृत्व उभे करायचे आहे, अशी रणनिती अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली आहे. कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे. तरूण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार काम सुरू असल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. काल दिल्लीत मोदींनी शपथ घेतली आहे. धिरज हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असतील, ते झेंडावंदन करतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. माझी भुमिका मी दुपारी कार्यक्रमात स्पष्ट करेल, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच मंत्रालयात राज्यातील मान्सूनचा तयारी आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काळवेळ कोणासाठी थांबत नाही. २५ वर्ष पुर्ण झाली (National Congress Party 25 Anniversary) आहेत. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. लोकसभेचा निकाल बघितला आहे. कुठं कमी पडलो, हे विचारात घेऊन पुढची तयारी करायची आहे. तरूणांचे नेतृत्व उभे करायचे आहे. तरूण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) २५वा वर्धापन दिन सायन येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जात आहे. यासाठी अजित पवार गटाने जय्यत तयारी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर वर्धापन दिनामध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं (Assembly Election) आहे. आजच्या वर्धापनदिनासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं कार्यालय फुलांनी सजवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT