Satara political news  Saam tv
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

satara politics : महापालिका निवडणुकांचं मतदान होताच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक झाली.

Vishal Gangurde

महापालिका निवडणुकीनंतर शिंदे गट आणि राष्ट्रवादीची गुप्त बैठक

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू

दोन्ही पक्षाच्या बोलावली गुप्त बैठक

राज्यातील २९ महापालिकांचं मतदान आज गुरुवारी पार पडलं. या महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची गुप्त बैठक पार पडली. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती कोणासोबत होणार याबाबतच्या महायुतीमध्ये चर्चा रंगू लागली असतानाच आज राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी पार पडली.

बैठकीला आत कोणालाही प्रवेश दिला गेला नव्हता. यामुळे यापुढील काळात महायुतीमध्ये भाजपने विचारात न घेतल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत या बैठकीतून स्पष्ट होत आहेत. याबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट आणि चहा पाण्याला आलो असल्याचं सांगितलं.

खासदार नितीन पाटील यांनी प्राथमिक चर्चेसाठी आलो असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. मात्र भाजपला कुठेही वगळले नसल्याचे ज्यावेळी त्यांनी स्पष्ट केला आहे. या बैठकीबाबत मात्र मंत्री मकरंद पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT