लातूर - काल राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ED ने अटक केल्याचे पडसाद उदगीर (Udgir) इथं उमटले आहेत आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीनं आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना केंद्र सरकार आणि भाजप ED च्या प्रकरणात अडकवून राज्यातील मंत्र्यांना अडचणीत आणून बदनाम करण्याचे कारस्थान करत आहे.
हे देखील पहा -
कोणत्याही प्रकरणात अडकवून सरकार अस्थिर कसं करता येईल अशी दुष्टनितीचा वापर करत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या विधान करतात आणि ED कारवाई करते त्याच्या इशाऱ्यावर ED काम करत असून राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बसवराज पाटील नागराळकर यांनी सांगितले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.