Nilesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

नवाब मलिक हे दाऊदचे फ्रंट मॅन; निलेश राणेंचा गंभीर आरोप

अजित पवार या विषयात काही बोलत नाहीत अजित पवार शांत आहेत. अशा प्रकरणात ते बोलत नाहीत ते आत्मक्लेश करतात असा टोला निलेश राणे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

अमोल कलये

रत्नागिरी - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊदचे फ्रंट मॅन असू शकतात अशी खळबळजनक टिका भाजपचे (BJP) प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याच मुद्यावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रत्नागिरीत (Ratnagiri) पत्रकार परिषद घेतली. दाऊदच्या माणसाकडून जमिन खरेदी करता ते ही कवडीमोल भावानी त्यात ब्लॅक मनीचा वापर झाला आहे. त्याचमुळे याचा ट्रेंड ईडी घेत आहे. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रु आहे. बाॅम्ब ब्लास्ट घडवणाऱ्यांकडून तुम्ही जमिन खरेदी करता, या एका प्रकरणात सरदार पटेल फ्रंट मॅन असू शकतो पण दाऊदचा खरा फ्रंट मॅन नवाब मलिक हे असू शकतात असा खळबळ जनक आरोप माजी खासदार निलेश राणें यांनी केला आहे.

हे देखील पहा -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाॅन्ड्रीॅंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आता भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निषाणा साधला आहे. निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निषाणा साधला. शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे. मलिक यांचा राजिनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, पण पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये असं सांगत निलेश राणे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. दाऊदचा माणुस पवार यांना चालतो, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्याना फोन लावता, पण यावर काही बोलत नाही असा खोचक टोला निलेश राणेंनी पवार यांना लगावला.

निलेश राणेंनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टिकेचे लक्ष केलं. नबाव मलिक यांना अटक झाल्यावर त्यांच्या प्रकृतीची काळजी सुप्रिय सुळे यांना होती. नवाब मलिक यांच्या प्रकृतीची काळजी वाटत होती त्याच्या दुसऱ्या दिवशी प्राणी संग्रहालयात फुलांची आणि प्राण्यांची पाहणी करत होत्या. यातूनच सर्व प्रकर लक्षात येतो. त्यामुळे त्यांना याचे गार्भिय कळले असावे असा टोला निलेश राणेंनी सुप्रिया सुळे यांना लगावला. तर अजित पवार या विषयात काही बोलत नाहीत अजित पवार शांत आहेत. अशा प्रकरणात ते बोलत नाहीत ते आत्मक्लेश करतात असा टोला निलेश राणे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होते आहे. शिवसेनेलाच नाही तर राष्ट्रवादीला सुद्धा मलिक हे दाऊदचा माणुस आहे हे कळल आहे. संजय राऊत ढेपाळले आहेत आता ते धड बोलू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टिका निलेश राणें यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

सुवेंदू अधिकारींच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, निकालानंतरही बंगलामध्ये हत्येचं सत्र सुरूच

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT