नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नवनीत राणांचे अश्रू अनावर... अरुण जोशी
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नवनीत राणांचे अश्रू अनावर...

थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची Rain संततधार सुरु आहे. त्यामुळे अमरावतीत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेती सह अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती Amravati मध्ये सध्या नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत.

तर लोकसभेचे कामकाज आटोपून अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा Navneet Rana थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या आहेत. पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त Damaged भागाची पाहणी केली. यावेळी नवनीत राणा यांनी भर चिखलातुन पुराच्या पाण्यातून वाट काढत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

हे देखील पहा -

जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री यांनी विदर्भात झालेल्या पावसाची आणि या पावसामुळे झालेल्या परिस्थितीची पहावी करावी. स्वतः गाडी चालवत विदर्भातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कळणार कस, मदत कशी दिली जाणार असा प्रश्न वनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT