Navneet Rana and Ravi Rana latest News Update SAAM TV
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याला सद्बुद्धी येण्यासाठी शिवसैनिक करणार 'हनुमान चालीसा'

राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रति आव्हान शिवसैनिकांनी दिले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सभेपुर्वी दिल्लीत (Delhi) हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रति आव्हान अमरावतीच्या (Amravati) शिवसैनिकांनी दिले आहे.

हे देखील पाहा-

अमरावती जिल्ह्याच्या विकासावर लक्ष न देता पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरावर केंद्र सरकारवर चकार शब्दही न बोलनाऱ्या आमदार खासदार जोडीला सद्बुद्धी मिळण्यासाठी शिवसेना अमरावती महानगराच्यावतीने अमरावती (Amravati) येथील जागृत पांढरी हनुमान मंदिर येथे १४ मे रोजी सकाळी ९ वाजता महाआरती करण्यात येणार अशी माहिती शिवसेना (ShivSena) महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिली.

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगातून सुटका झाल्यावर आणि लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर राणा दाम्पत्याने राजधानी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. २ दिवस विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप यावेळी राणा दाम्पत्याने केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT