Navneet Rana Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : घाणेरडे इशारे, शिवीगाळ, माझ्यावर थुंकले - नवनीत राणांचा गंभीर आरोप, अडसूळ यांची फिरकी

Navneet Rana Rally Rada : नवनीत राणा यांच्यावर प्रचारसभेत शनिवारी रात्री जोरदार राडा झाला. खुर्च्या फेकल्या, शिवीगाळ केली. याप्रकरणी अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Namdeo Kumbhar

Amravati rada in Navneet Rana Rally : नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवारी रात्री राडा झाला. नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात प्रचार सभेदरम्यान दोन गटांमध्ये राडा झाला. यावेळी काही लोकांनी खुर्च्यांची फेकाफकी केली. खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या गावात शांततेचे वातावरण आहे. दुसरीकडे पोलिसांनी या राड्या प्रकरणी 45 जणांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांना ताब्यात देखील घेतलं आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी २४ तासांच्या आत कारवाईचा इशारा दिलाय. तर अभिजित अडसूळ यांनी याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

माजी खासदार नवनीत राणांचा इशारा, २४ तासांत...

माझ्याविरोधात हे ठरवून कटकारस्थान करण्यात आलेय. स्टेजवर भाषण करत असताना घाणेरडे इशारे करण्यात आले. मला शिवीगाळ करण्यात आली. माझ्यावर थुंकले. २४ तासांच्या आत कारवाई झाली नाही, तर अमरावतीचं चित्र बदलेलं असेल.
नवनीत राणा, माजी खासदार

अभिजीत अडसूळ यांचा नवीनत राणा यांच्यावर मोठा आरोप -

शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आशा प्रकारच्या घटना दुर्दैवी आहेत, त्या घडू नयेत. पण नेहमी नवनीत राणा यांच्यासोबत हे का घडतं? हा प्रश्न आहे. नवनीत राणा यांचे उमेदवार घाबरले आहेत. ते चिंतेत आहेत. मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा नवनीत राणा यांचा डाव असल्याचा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केलाय.

जनता हुशार आहे, कोणत्याही जाती-पातीच्या भांडणात पडणार नाही. जनतेला विकास पाहिजे, आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत, असेही आडसूळ म्हणाले.

अनिल बोंडे काय म्हणाले ? मविआवर गंभीर आरोप -

नवनीत राणा यांच्यासोबत झालेली घटना चीड आणणारी आणि संतापजनक आहे. बाकी लोकांनीं जर संयम सोडला असता तर ते वाचले नसते, हे महाविकास आघाडीच्या चमच्यांनी धर्मांद लोकांनी लक्षात ठेवावं, असे अनिल बोंडे म्हमाले.

या घटनेचा निषेध करून आम्ही जिल्हाभरात निवेदन देणार आहे. नवनीत राणांच्या परावानंतर जे अश्लील चाळे आणि वर्तन झाले ते याच लोकांचे होते. आता त्यांची हिंमत नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याएवढी झाली. महाविकास आघाडी जनता दहशतग्रस्त लोकांना संरक्षण देते, त्यामुळे जनतेच्या न्यायालयात याचा फैसला होणार आहे, असेही अनिल बोंडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Personal Loan चा अर्ज करताना बँक Blank cheque का मागते? काय आहे नियम, जाणून घ्या सर्वकाही

SCROLL FOR NEXT