Belapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Belapur Crime : पोलीस पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; बचत गटाच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: नवी मुंबईतील बेलापूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात नागरिकांची तब्बल ८२ लाख रुपयात फसवणूक केली आहे. या प्रकरणी बेलापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) सिबिडी बेलापूरमधील पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलीस पत्नी सारिका चव्हाण यांनी बचत गटाद्वारे आपला जनसंपर्क वाढवला. या नंतर भिसी आणि फंडाच्या विविध योजना असल्याचे सांगून या योजनेमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो; असे आमिष नागरिकांना दाखवले. या अमिषाला बळी पडून बेलापूरमधील (Belapur) अनेकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास दिले. साधारण ८२ लाखापेक्षा अधिकची रक्कम त्यांनी गुंतवणुकीसाठी घेतली होती. 

यात बेलापूर परिसरातील रहिवासी सोनम काचगुंडे या महिलेने १६ लाख ५८ हजार रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली. मात्र गुंतवणूक केलेल्या योजनांची मुदत संपल्यावर देखील गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास सारिका चव्हाण यांनी टाळाटाळ केली. सोनम कचगुंडे यांच्याकडून १६ लाख ५८ हजार तर इतर अनेक महिला व पुरुषांकडून ६५ लाख २८ हजार असे एकूण ८२ लाख २८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी गेले असता सारिका चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना शिवीगाळ करत धमकी देखील दिली. याप्रकरणी फिर्यादी सोनम काचगुंडे यांच्या तक्रारीवरून बेलापूर पोलीस ठाण्यात सारिका चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant Mobile : पुण्यात उदय सामंतांचा मोबाईल हरवला

Pune News: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले...

India : भारतातील 'ही' 3 सुंदर गावं पाहिलीत का? परदेशाचे सौंदर्यही पडेल फिके !

Pune : पुण्यात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना; अंगात काचा घुसल्याने ४ कामगारांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : नाशिक मुंबई हायवेवर ट्रक पलटी, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी

SCROLL FOR NEXT