ऐकलतं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात गणेश नाईकांनी केलेली ही विधानं चर्चेत आहेत.. अशातच भाजप पदाधिकाऱ्यांनी विभागातील कामांना ब्रेक लावला जात असल्याचा आरोप करत नाईकांसमोर एकनाथ शिंदेंविरोधात नाराजी व्यक्त केलीय...इतकचं काय, तर भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय..
ठाण्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष अनेक वर्षांपासून पाहायला मिळतोय. त्यातच ठाण्यात गणेश नाईकांकडून जनता दरबार घेतला जात असल्यानं शिंदेसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय..मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून नाराजी सत्र सुरु होण्यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत पाहूयात...
शिंदेसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर वरचष्मा ठेवण्यावरून वाद निर्माण झालाय... शिंदेंसेनेनं नगरसेवकांसाठी मनाप्रमाणे प्रभाग रचना केल्याची टीकाही नाईकांच्या समर्थकांकडून केली जातेय..तसचं पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मात्तबर उमेदवार असल्यानं शिंदेसेना आणि भाजपची युती होण्यात आव्हानं उभी राहिलेत...
नवी मुंबई महापालिकेत एकूण 111 नगरसेवक असून त्यात 50 ते 52 माजी नगरसेवक नाईकांचे समर्थक आहेत. तर शिंदेसेनेत सध्या 45 ते 50 नगरसेवक आहेत..दरम्यान ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गणेश नाईकांनी दांडी मारल्यानं शिंदे आणि नाईक यांच्यामधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.. अशात दोन्ही नेत्यांकडून नवी मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे..
गणेश नाईकांच्या समर्थकांची शिंदेविरोधात नाराजी असल्यानं नवी मुंबई महापालिकेत युती एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हानं महायुतीपुढे असणार आहे.. आता पक्षश्रेष्ठींकडून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर केली जाते? शिंदेंविरोधातील नाराजी दूर करण्यासाठी मुख्य़मंत्री नेमकी काय भूमिका घेतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.