Uran Police Station, Navi Mumbai Saam TV
महाराष्ट्र

Navi Mumbai Crime : उरणमध्ये १४ वर्षीय मुलाचा ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; पीडितेने आईला सांगितल्यावर बसला मोठा धक्का

Uran Crime News : उरणमध्ये एका १४ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सिद्धेश म्हात्रे

Uran Crime News : उरणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने अत्याचार (Sexual Assault) केले. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने उरण पोलीस ठाणे गाठले. संशयित आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात तिने पोलिसांत तक्रार नोंदवली. (Crime News)

उरण पोलिसांनी (Uran Police) तात्काळ संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेतले असून, उरण पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर उरण परिसरात खळबळ उडाली आहे. (Navi Mumbai)

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

परिमंडळ २ चे उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथील १४ वर्षीय मुलाने शेजारील ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT